खूप वर्षांनी एक मराठी पुस्तक वाचायला घेतलं. ते संपवायला किती वेळ लागेल, जुनी मराठी भाषा असल्यामुळे आपल्याला कितपत शब्द माहित असतील, ह्या सगळ्या बद्दल मी साशंक होते. पण हे पुस्तक इतकं रंजक आहे की एकवेळ बसून आरामात ३०-४० पानं वाचून व्हायची. शेवटची ७० पानं सलग वाचावी अशीच आहेत. माधवराव पेशव्यांबद्दलचं 'स्वामी' हे पुस्तक वाचून झाल्यावर, त्याबद्दल चा हा review .
शाळेमध्ये इतिहास हा खरंतर माझा आवडीचा विषय होता. तरी पण मला इतिहासात पेशव्यांबद्दलचं डिटेल मध्ये शिकलेलं अजिबात आठवत नाही. शिवाजी महाराज, भारताची स्वातंत्र चळवळ, world wars, ह्या बदल शिकलो, पण ज्यांनी शिवाजींनंतर पूर्ण भारतावर राज्य केलं त्यांच्या बद्दल शाळेत जास्त शिकवलं गेलं नाही. आत्तापर्यंत कधी ह्या काळाबद्दल स्वतःहून research किंवा अभ्यासाची वेळ आली नाही. आता त्याची त्रुटी भरून काढावीशी वाटत आहे.
'स्वामी' हे लेखक रणजीत देसाई ह्यांचं, थोरल्या माधवरावांबद्दलचं पुस्तक आहे. आपल्याला थोरले माधवराव हे रमा-माधव ह्या मालिकेतून, picture मधून माहित आहेत. पण त्यांचा कर्तृत्व, त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार हे जास्त highlight झालेले नाहीत. थोरले माधवराव हे खूप कमी वयात पेशवे बनले. एवढी जबाबदारी लहान वयात येऊनही त्यांनी ती खूप चांगली पेलली, कधी आपल्या ध्येयापासून आणि निष्ठेपासून दूर न जाता, पानिपतच्या युद्धानंतर हरवलेली पेशवाईची शान परत आणली. खूप कमी वयात tuberculosis आजाराने त्रस्त झाले नसते आणि अजून काही वर्ष जगले असते तर नक्कीच भारताचा इतिहास वेगळा असता असं मला वाटतं.
ह्या सगळ्या मध्ये एक जाणवलेली गोष्ट म्हणजे राघोबा दादांची. पेशव्याचे हे काका असले तरी सगळ्यात जास्त पेशव्यांना विरोध आणि अडवाआडवी त्यांनीच केली. माधवरावांचा अर्धा वेळ हा internal fights मधेच गेला. हा वेळ, पैसे, माणसं जर शत्रूवर चालून जायला उपयोगी पडली असती तर चित्र काहीसं वेगळं असतं. तसं बघायला गेला तर अजूनही इतक्या वर्ष नंतर, आपल्याकडे तेच चालू आहे. घराघरामध्ये भांडणं, भारता मध्ये राहून पण देशाच्या विरुद्ध बोलणारे आणि वागणारी लोकं. आपण इतिहासातून काहीच शिकलो नाही असं म्हणायचं.
हे पुस्तक वाचून मला माहिती तर खूपच मिळाली पण माझी पेशव्यांच्या कारकिर्दीबद्दल अजून वाचायची इच्छा पण वाढली आहे. Lockdown संपला कि एकदा शनिवारवाड्यावर जाऊन पुस्तकात वर्णन केले आहेत ते दिल्ली आणि गणेश दरवाजे बघायचे आहेत. पेशवाईबद्दल अजून बरंच काही वाचायचं आहे. राघोबादादांची बाजू मांडणारे काही असेल तर ते वाचायचं किंवा बघायचं आहे. कारण ह्या पुस्तकातून तर बाकीच्या शत्रूंपेक्षा तेच सगळ्यात जवळचे आणि मोठे शत्रू आहेत असा दिसून येतं.
पुस्तकात अवघड मराठी शब्द आहेत खरे. पण context मध्ये ते समजून जातात. मी गोधळले ते आजूबाजूंच्या व्यक्तींमुळे. सगळ्यांची नावं लक्षात ठेऊन, त्यांची टोपण नावं लक्षात ठेवणं खूपच अवघड गेलं. नाना, बापू, दादा, राव, अश्याने संबोधन केल्यावर नक्की कोणाबद्दल बोललं जातंय हे कळायला वेळ लागला. बरीच अशी जवळची मंडळी असल्यामुळे अशी अनेक नावे सहजच मध्ये मध्ये येतात. ते समजून घ्यायला थोडा वेळ लागतो.
ह्या सगळ्या नंतर वाटला तो पुण्याबद्दलचा जाज्वल्य अभिमान, आधी पेक्षा ही जास्त. भारतावर राज्य केलेल्या सत्तेची राजधानी पुण्यात होती आणि त्या वेळेस च्या इमारती, जिथे हे सगळं घडलं, अजूनही आपल्याला बघायला शाबूत आहेत, हि किती अभिमानाची बाब आहे.